Add parallel Print Page Options

प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [a] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.

परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
    तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.

मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
    येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.

परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
    आणि मला आश्चर्य वाटते.
लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
    तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [b] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
    तू त्यांची दखल तरी का घेतोस?

परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
    तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
तू लोकांना तू निर्माण केलेल्या
    सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
ते आकाशातल्या पक्ष्यांवर
    आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

Footnotes

  1. स्तोत्रसंहिता 8:1 गित्तीथच्या सुरावर हे कदाचित एखादे वाद्य असू शकेल. किंवा देवळातील वाद्यवृंदात वाद्य वाजवणारा वादक. पाहा 1 इतिहास 15:21, 16:4-7.
  2. स्तोत्रसंहिता 8:4 लोक … लोक शब्दश: “माणूस माणसाचा मुलगा” किंवा एनॉश. आदमाचा मुलगा, माणसे आदामाची आणि एनॉशची वंशज आहेत असे सांगण्याची ही हिब्रू पध्दत आहे. नवीन शास्त्रात याचा उपयोग एक माणसाचा, येशूचा किताब म्हणून केला आहे.